नवी दिल्ली – “मैं देश नही बिकने दूंगा”, हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नारा प्रसिद्ध आहे. त्यांच्या या नाऱ्यावरच आम आदमी पक्षाचे प्रवक्ते आणि खासदार संजय सिंह यांनी कविता केली असून त्यांच्यावर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योगपतींच्या प्रेमात आपली घोषणा बदलली आहे. आता पंतप्रधानांची घोषणा “मैं देश नही बचने दूंगा” अशी झाल्याचं म्हटले आहे. त्यांनी आपल्या ट्विटल हँडलवरून एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.
बघा व्हिडिओ
https://twitter.com/AamAadmiParty/status/1356270599652343808
मोदी भांडवलदारांचे मित्र
केंद्र सरकारनं अर्थसंकल्प मांडल्यानंतर खासदार संजय सिंह यांनी टीका केली आहे. हा अर्थसंकल्प नेमका कोणासाठी तयार केला आहे. चार भांडवलदारांसाठी तयार केला आहे, मोदी हे देशाचे नसून चार भांडवलदारांचे मित्र आहेत हे देशाला समजले आहे. संपूर्ण देश विकण्यासाठीच तयार केला आहे. एक सपूत असतो जो आपल्या कुटुंबाची संपत्ती वाढवतो. तर एक कपूत असतो जो कुटुंबाची संपत्ती विकतो.