मोती वापरायचा आहे? मग हे वाचाच
मोती वापरण्याचे अनेकांना आकर्षण असते. मात्र, मोती खरेदीमध्ये फसगत होऊ शकते. तसेच, मोतीची शास्त्रोक्त माहिती घेणे आवश्यक आहे. त्यामुळे आज त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत….

इ मेल – [email protected]
मोती हे चंद्र ग्रहाचे रत्न आहे. कुंडलीमध्ये कर्क, मीन अथवा धनु लग्न असल्यास, कुंडलीतील चंद्र सहा-आठ बारा भावात असल्यास, चंद्राची राहू अथवा केतू शनी बरोबर युती असल्यास, एकूणच कुंडलीतील चंद्र नकारात्मक असल्यास, हस्तरेषा वरील करंगळी वरील नकारात्मक चिन्हे यांचा अभ्यास करून हे दोन्ही उपलब्ध नसल्यास आणि वास्तूच्या वायव्य दिशेच्या अभ्यासावर मोती रत्न सूचवले जाते.
बसरा मोती
हा अतिशय दुर्मिळ व महाग मोती असतो. PINTATA, RIDIYATA, PITIRIA हे त्यातील काही प्रकार आहेत. यांचा आकार ओबड-धोबड असतो. निश्चित असा रंग नसतो. हा मोती दुर्मिळ असल्याने सर्टिफिकेट्स सह घ्यावा.

केशी मोती
केशी मोती हा बसरा मोतीपेक्षा स्वस्त असतो. याचा आकार देखील निश्चित नसतो. पिवळसर पांढरा रंगामध्ये असतो. ऑस्ट्रेलियन मोती यामध्ये TEDAKANA हा प्रकार मिळतो. व्हेनेझुएला मोती हे देखील मोती अधिक वापरण्यामध्ये येतात. यांचे आकार देखील ओबडधोबड असतात. साउथ सी मोती, कल्चर्ड मोती, बटण मोती त्या मानाने बरेच स्वस्त असतात.
मोती हा करंगळीत चांदी मध्ये वापरला जातो. मोत्याचे पेंडंट, मोती माळ, मोत्याचे कानातले अशा विविध प्रकारे मोती वापरला जातो. अन्य रत्नांप्रमाणेच मोती देखील तज्ञांच्या सल्ल्याने वापरावा. मोत्याची नैसर्गिक रचना ही थरांवर असते. या थरांवर ओरखडे आल्यास अथवा थर फाटल्यास पुढे मोती वापरू नये.










