नवी दिल्ली – भारतीय नागरिकांसाठी मोठी बातमी आहे. सिरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड ही कोरोना लस या आठवड्यातच उपलब्ध होण्याची चिन्हे आहेत. या लसीने सर्व चाचण्या पूर्ण केल्या असून आपत्कालीन वापरासाठी केंद्र सरकारकडे अर्ज केला आहे. त्यास काही दिवसातच मंजुरी मिळण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे देशातील पहिली स्वदेशी लस सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होणार आहे.
अधिकृत सूत्रांनी सांगितले की, सीरमने ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया या संस्थेकडे कोविशिल्ड या कोरोना लसीच्या आपत्कालीन परिस्थितीत वापर करण्याची परवानगी मागितली आहे. कंपनीने क्लिनिकल ट्रायल्स (चाचणी) नंतर डेटामध्ये असे म्हटले आहे की, लक्षणे आणि गंभीर कोरोना रूग्णांच्या बाबतीत कोविशिल्ड अत्यंत प्रभावी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच सिरम इन्स्टिट्यूटच्या पुण्यातील प्रकल्पाला भेट देऊन या लसीच्या निर्मितीची माहिती घेतली होती.
विशेष म्हणजे, एक दिवस अगोदरच अमेरिकन औषधनिर्माण कंपनी फायझरनेही भारतात लस आयात आणि वितरण करण्याची परवानगी मिळावी आणि आपत्कालीन वापरास परवानगी द्यावी, असा अर्ज केला आङे. त्यापाठोपाठ आता सिरमनेही अर्ज केला आहे. मात्र, सिरमला परवानगी मिळण्याची चिन्हे आहेत.
चाचणीत ९० टक्के पर्यंत प्रभावी :
सीआयआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला म्हणाले होते की, कोविना लस ‘कोविशिल्ड’ चाचणीत ९० टक्क्यांपर्यंत प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. लवकरच प्रत्येकासाठी उपलब्ध होईल. अॅस्ट्रॅजेनेकाबरोबर १० कोटी डोसचा डील करार झाल्याचा दावाही त्यांनी केला.
केंद्र सरकारचीही वेगवान तयारी :
कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी केंद्र सरकारने लसीच्या संदर्भात तयारीही वेग वाढविली आहे. केंद्रातील मोदी सरकारने लस बाजारात येण्यापूर्वी सुमारे १.६ अब्ज लसींचे आदेश दिले आहेत. ऑर्डर देण्याच्या बाबतीत भारत पहिल्या क्रमांकावर आहे. काही आठवड्यांत देशात कोरोनाची लस तयार केली जाऊ शकते.
देशी लसीवर भर :
सध्या देशात एकूण आठ लसींचे क्लिनिकल चाचण्या सुरू आहेत. या सर्व लस देशात तयार केल्या जात आहेत. यापैकी तीन लस देशातच तयार झाल्या आहेत. पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, भारत देशी लसीवर अधिक अवलंबून आहे. विशेष म्हणजे ही लस सर्वप्रथम आरोग्यसेवा आणि कोरोनाच्या उपचारात सहभागी कर्मचारी व कामगारांना दिली जाईल.