मॉस्को – कोरोना विषाणू प्रतिबंधक जगातील पहिली लस विकसित केल्याची घोषणा रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी केली आहे. तसे वृत्त एएफपी या वृत्तसंस्थेने दिले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या लसीला मंजुरी दिली तर संपूर्ण जगभरात तिचा अवलंब होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने या लसीला परवानगी दिली आहे. विशेष म्हणजे, माझ्या मुलीलाही या लसीचा डोस देण्यात आल्याचे पुतिन यांनी जाहीर केले आहे. ही लस गामेल्या इन्स्टिट्यूटने विकसित केली आहे. या लसीचे लवकरच उत्पादन सुरू होणार असल्याचेही पुतिन यांनी सांगितले आहे.