मुंबई – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यभरातील उमेदवारांसाठी मोठी घोषणा केली आहे. आयोगाने UPSC पद्धतीनेच परीक्षा घेण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळेच खुल्या प्रवर्गातील (ओपन) विद्यार्थ्यांना आता तब्बल सहा वेळा एमपीएससी परीक्षा देता येणार आहे.
अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना मात्र संधीची मर्यादा नसणार आहे. त्यामुळे त्यांना चांगले प्रयत्न करता येतील. मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना नऊ वेळा परीक्षा देता येणार आहे. एखादा उमेदवार जर पूर्व परीक्षेच्या कोणत्याही एका पेपरला उपस्थित असेल तर ती संधी मानली जाणार आहे. तसेच, कोणत्याही कारणामुळे परीक्षार्थी परीक्षेला अनुपस्थित राहिला तर ती सुद्धा संधी मानली जाणार आहे. हे नवे निकष पुढील वर्षापासून (२०२१) होणाऱ्या परीक्षांसाठी लागू होणार आहेत.