मुंबई – जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलन मस्कची दिग्गज इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाने बिटकॉनमध्ये तब्बल १.५ बिलीयन डॉलरची गुंतवणूक केली आहे. या बातमीनंतर बिटकॉईनची किंमत आतापर्यंतच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचली आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, टेस्लाने गुंतवणुकीची घोषणा केल्यानंतर लंडनमध्ये सोमवारी दुपारी बिटकॉनची किंमत १० टक्क्यांनी वाढून ४२ हजार ५९५ डॉलरपर्यंत पोहोचली आहे. टेस्लाने आपल्या गुंतवणूक पॉलिसीच्या बाबतीत अपडेट देताना ही माहिती दिली.
आटोमोबाईल कंपनी टेस्लाचे मालक एलन मस्क दूरदृष्टी आणि आधुनिक विचारांसाठी ओळखले जातात. टेस्लाची बिटकॉनमधील गुंतवणूक सांगते की, क्रिप्टो करन्सी आता अचानक वर आली आहे. क्रिप्टो करन्सी एक अशी मुद्रा आहे जी डिजीटल स्वरुपात जारी केली जाते.
क्रिप्टोग्राफी व ब्लॉकचेनसारख्या डिस्ट्रीब्युटर लेजर टेक्नॉलॉजीच्या आधारावर ही करन्सी काम करते. ब्लॉकचेन एक असे वहीखाते आहे ज्यात व्यवहाराची नोंद ब्लॉक्सच्या रुपात केली जाते. त्यानंतर क्रिप्टोग्राफीसोबत त्याला लिंक केले जाते. माहिती पोहोचविण्याचा आणि समजण्याचा उत्तम मार्ग म्हणजे क्रिप्टोग्राफी आहे. त्यात कोडचा वापर केला जातो. त्यामुळे केवळ तीच व्यक्ती समजू शकते ज्याला संबंधित माहिती पाठविण्यात आली आहे.
बिटकॉन सर्वाधिक प्रचलित क्रिप्टो करन्सी आहे. याचे जसे काही फायदे आहेत तसेच काही तोटेही आहे. ग्राहकांच्या समस्या आणि तक्रारींच्या समाधानासाठी यात कुठलेच तंत्र उपलब्ध नाही. याशिवायक्रिप्टो करन्सीमध्ये चोरी, मनी लॉन्ड्रींग आणि दहशतवाद्यांचे फंडींग आदी गोष्टींचा सहभाग असण्याचीही भिती असते.