नवी दिल्ली – कौटुंबिक पेन्शनसंदर्भात दूरगामी सुधारणा करत या पेन्शनच्या प्रती महिना कमाल मर्यादेत ४५ हजारावरून थेट १ लाख २५ हजार रुपयांपर्यंत वाढ करण्यात आला आहे. तशी माहिती केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन राज्य मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी दिली आहे. यामुळे दिवंगत कर्मचाऱ्याच्या कुटुंबातल्या सदस्यांचे जीवनमान सुलभ होण्याबरोबरच त्यांना पुरेशी आर्थिक सुरक्षितता प्राप्त होणार आहे.
माता-पित्याच्या मृत्युनंतर अपत्य, दोन कौटुंबिक पेन्शनसाठी पात्र असेल तर स्वीकारार्ह रकमेबाबत निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाने स्पष्टीकरण जारी केल्याचे त्यांनी सांगितले. दोन्ही कौटुंबिक पेन्शनची रक्कम आता सव्वा लाख रुपये प्रती महिना पर्यंत मर्यादित करण्यात आली असून आधीच्या मर्यादेच्या अडीच पटीपेक्षा ही रक्कम जास्त आहे.
केंद्रीय नागरी सेवा ( निवृत्तीवेतन ) नियम १९७२ च्या नियम ५४ च्या उपनियम (11) नुसार पती आणि पत्नी दोघेही सरकारी कर्मचारी असतील आणि या कायद्याच्या तरतुदी त्यांना लागू असतील तर त्यांच्या मृत्युनंतर त्यांचे जीवित अपत्य दोन कौटुंबिक पेन्शनसाठी पात्र राहील.