नवी दिल्ली – वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी असून उद्यापासून (१ जानेवारी) फास्ट टॅग सक्तीचे राहणार नाही. केंद्र सरकारने फास्ट टॅगला येत्या १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे अद्याप ज्यांनी फास्ट टॅग काढलेला नाही त्यांना तो येत्या दीड महिन्यात काढून घेता येईल.
राष्ट्रीय महामार्गावर टोलच्या ठिकाणी फास्टटॅग सक्तीचा करण्याचा निर्णय रस्ते व वाहतूक मंत्रालयाने घेतला आहे. १ जानेवारीपासून याची सक्ती करण्याचे निश्चित करण्यात आले. टोलच्या ठिकाणी वेळ वाचावा, टोलच्या कारभारात पारदर्शकता यावी, वाहतूक कोंडी दूर व्हावी या हेतूने फास्ट टॅग महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र, आता १५ फेब्रुवारीपासून फास्ट टॅग अनिवार्य राहणार आहे.