रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मोठा दणका!!! उमराणे आणि खोंडामळी ग्रामपंचायतीची निवडणूक रद्द

by India Darpan
जानेवारी 13, 2021 | 1:30 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0

मुंबई – नाशिक जिल्ह्यातील उमराणे (ता. देवळा) आणि नंदुरबार जिल्ह्यातील खोंडामळी (ता. नंदुरबार) या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंच व सदस्यपदांचा जाहीर लिलाव झाल्याबद्दलचे पुरावे प्राप्त झाल्यामुळे या ग्रामपंचायतींची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया रद्द केली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली.

श्री. मदान यांनी सांगितले की, उमराणे आणि खोंडामळी ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंच व सदस्यपदांचा जाहीर लिलाव झाल्याबाबतच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्याचबरोबर आयोगाकडे तक्रारीदेखील प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने आयोगाने अहवाल मागविले होते. जिल्हाधिकारी, निवडणूक निरीक्षक, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांचा अहवाल; तसेच विविध कागदपत्रे आणि ध्वनिचित्रफितींचे अवलोकन केल्यानंतर या ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. खोंडामळी येथील लिलावप्रकरणी आधीच नंदुरबार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आता अधिक तपास करून भारतीय दंड विधानाचे कलम 171 (क) अथवा अन्य कायद्यांतील तरतुदींनुसार संबंधितांविरूद्ध कायदेशीर कारवाई करून आयोगास अहवाल सादर करावा, असे निर्देश नाशिक आणि नंदुरबारचे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहेत.

केवळ काही ग्रामस्थांच्या एकतर्फी दबावात्मक निर्णयामुळे इच्छुक उमेदवारांना मुक्त वातावरणात निवडणूक लढविण्यापासून आणि मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा प्रकार या दोन्ही गावांमध्ये झाला आहे. यातून लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांचे आणि आचारसंहितेचा भंग झाल्याचे सकृतदर्शनी सिद्ध होत आहे. अशा प्रकारांमुळे निवडणूक लढविण्याची सर्वांना समान संधी प्राप्त होऊ शकत नाही. हे प्रकार टाळण्यासाठी निर्भय, मुक्त व पारदर्शक वातावरणात निवडणूक घेण्याची संविधानिक जबाबदारी राज्य निवडणूक आयोगावर आहे. ही संविधानात्मक जबाबदारी पार पाडण्यासाठी आयोगाने या दोन्ही ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया रद्द केली आहे, असे श्री. मदान यांनी सांगितले.

—

निवडणूक लढविण्याची सर्वांना समान संधी प्राप्त करून देणे व निवडणूका निर्भय, मुक्त व पारदर्शक वातावरणात पार पाडणे ही प्रशासनाची संविधानिक जबाबदारी आहे. त्यामुळे प्रस्तुत प्रकरणात सखोल चौकशी करून परिपूर्ण अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवला होता. त्यावर आयोगाने संविधानिक अधिकार वापरून निर्णय घेतलेला आहे.
– सूरज मांढरे, जिल्हाधिकारी, नाशिक
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कोरोना बाधितही करु शकणार मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Next Post

नाशिक कोरोना अपडेट- १८१ कोरोनामुक्त. २०५ नवे बाधित. २ मृत्यू

India Darpan

Next Post
corona 8

नाशिक कोरोना अपडेट- १८१ कोरोनामुक्त. २०५ नवे बाधित. २ मृत्यू

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

rain1

राज्यात पुढील काही दिवसात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता

जून 22, 2025
Untitled 74

महिलांच्या सशक्तीकरणाची नवी चळवळ…..‘बहिणाई मार्ट’च्या भूमिपूजनाने स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू

जून 22, 2025
CrestEH6T

भारतीय नौदलाच्या ताफ्यात ही युद्धनौका सामील होणार; रशियात होणार समारंभ

जून 22, 2025
Untitled 73

या जिल्ह्यासह पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट; राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती

जून 22, 2025
modi 111

इराणच्या राष्ट्रपतींना पंतप्रधान मोदी यांनी केला फोन….झाली ही चर्चा

जून 22, 2025
bjp11

ठाकरे गटाला मोठा धक्का….मुंबईत या दोन माजी नगरसेवकांनी केला भाजपात प्रवेश

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011