मुंबई – पोलिस दलातील अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकेप्रकरणी एनआयएनं नवा खुलासा केला आहे. १६ फेब्रुवारीला सचिन वाझे मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये पाच बॅग घेऊन गेले होते. घटनेच्या दिवशी निलंबित सचिन वाझे पाच बॅग आणि एका महिलेला हॉटेलमध्ये घेऊन गेले होते.
उद्योजक मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया घराबाहेर स्फोटकं ठेवल्या प्रकरणी तसंच ठाण्यातील व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणात सचिन वाझे मुख्य आरोपी आहे. सध्या ते एनआयएच्या ताब्यात आहे. २५ फेब्रुवारीला मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर २० जिलेटिनच्या कांड्या ठेवलेली स्कॉर्पिओ कार आढळली होती. त्याच्या दहा दिवसांपूर्वी १६ फेब्रुवारीला वाझे यांनी दक्षिण मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये चेक इन केलं होतं.
पैशांनी भरलेल्या
त्या दिवशी वाझे यांच्यासोबत एक महिला होती. तिची ओळख पटलेली नाही. १६-२० फेब्रुवारीपर्यंत ते हॉटेलमध्ये राहिले. एका बनावट आधारकार्डद्वारे हॉटेलमध्ये चेक इन केलं होतं. हॉटेलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी वाझे यांच्या सर्व बॅग स्कॅन करण्यात आल्या होत्या. एनआयएनं स्कॅनिंग मशिनचे व्हिडिओ तपासले असता त्या बॅगांमध्ये पैसे आढळले.
१०० दिवसांसाठी बुकिंग
एनआयए १६ फेब्रुवारीच्या दिवसाचे सीसीटीव्ही फुटेज तपासत आहे. तसंच स्कॅनिंग करणार्या कर्मचाऱ्यांची चौकशी करत आहे. एका व्यापार्यानं १३ लाथ रुपये देऊन १०० दिवसांसाठी सचिन वाझे यांच्या नावानं बुकिंग केली होती. ही बुकिंग एका ट्रॅव्हल एजंटच्या माध्यमातून करण्यात आली होती.
वाझे तीन एप्रिलपर्यंत ताब्यात
वाझे यांना गुरुवारी न्यायालयासमोर उभं करण्यात आलं. तीन एप्रिलपर्यंत वाझे यांचा ताबा वाढवण्यात आला आहे. त्या बॅगांसदर्भात वाझे यांची चौकशी सुरू आहे. मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढलेल्या खाडीवर वाझे यांना गुरुवारी नेण्यात आलं होतं.