बलिया – भगवद्गीतेवर आधारित ‘मोक्ष वृक्षा’चे चित्र काढून थेट गिनीज बुकात आपले नाव नोंदवले आहे. बलिया जिल्ह्यातील नेहा सिंह हिने खनिज रंगांचा वापर करत हे चित्र तयार केले आहे. १८ नोव्हेंबर रोजी तिला हा सन्मान प्राप्त झाला आणि काही दिवसांपूर्वीच तिला याचे प्रमाणपत्र मिळाले. त्यामुळे जिल्हाधिकारी श्रीहरी प्रताप शाही यांनी नेहाची भेट घेऊन तिचे कौतूक केले तसेच प्रमाणपत्रही प्रदान केले.
असे आहे चित्र
या चित्राचा आकार ६२.७२ चौ. मीटर एवढा आहे. गिनीज बुकच्या नियमांनुसार हे चित्र तयार करण्यात आले असून नेहाने सर्व कागदपत्रे ऑनलाइन जमा केली. मात्र कोरोनामुळे गिनीजकडून उत्तर येण्यास ४ महिने लागले.
काशी हिंदू विश्वविद्यालयात वैदिक विज्ञान केंद्रात शिकत असलेली नेहा या रेकॉर्डसाठी २०१९ पासून प्रयत्न करते आहे.
यापूर्वीचा विक्रम
यापूर्वी हा रेकॉर्ड आंध्रप्रदेशातील विजयवाडा येथील श्रेया तातीनेनीच्या नावे होता. तिने २९ सप्टेंबर २०१९ रोजी ५४.६७ चौ. मीटरचे चित्र खनिज रंगांपासून तयार केले. नेहाने सांगितले की, श्रेयाचा रेकॉर्ड तोडण्यासाठी तिने तेंव्हाच अर्ज केला होता. जवळपास ८ वेगवेगळी चित्रे नाकारल्यानंतर गिनीज बुककडून मान्यता मिळाल्यानंतर भगवद्गीतेवर आधारित हे चित्र काढले.
काशी हिन्दू विश्वविद्यालय के वैदिक विज्ञान केन्द्र की छात्रा रहीं नेहा सिंह ने गिनीज़ बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड्स में अपना नाम दर्ज कराकर विश्वविद्यालय को गौरवान्वित किया है। नेहा ने खनिज रंगों से सबसे बड़ी पेंटिंग बनाई है, जिसे @GWR में शामिल किया गया है। @VCofficeBHU pic.twitter.com/4JGsxr5YfS
— BHU Official (@bhupro) December 20, 2020