न्यूयॉर्क – गेल्या महिन्यापासून अमेरिका आणि युरोपमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर फैलाव होत असल्याने लवकरच विशिष्ट लसीच्या तातडीच्या वापरासाठी संबंधित कंपनीची परवानगी घेणार आहे. तर दुसरीकडे मॉडर्ना या अमेरिकन औषध निर्माता कंपनीने पुन्हा दावा केला की, ताज्या संशोधन आकडेवारीत त्याची लस ९४ टक्क्यांहून अधिक प्रभावी असल्याचे आढळले आहे. विशेष म्हणजे या लसीचे कोणतेही गंभीर दुष्परिणाम नाहीत. त्यामुळे मॉडर्नाच्या लसीला लवकरच आपत्कालीन मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.
अमेरिका आणि युरोपमध्ये लवकरच या लसीच्या तातडीच्या वापरासाठी कंपनीची परवानगी घेणार आहे. कारण अमेरिकेत कोणतीही लस किंवा औषधाचा वापर करण्यासाठी अमेरिकेच्या नियामक अन्न व औषध प्रशासनाची मान्यता आवश्यक आहे. मात्र अशा आपत्कालीन मंजुरीसाठी हजारो लोकांचा अभ्यास आवश्यक आहे.
सहसा या प्रक्रियेस सुमारे १० वर्षे लागतात. परंतु सध्या परिस्थितीत साथीच्या वेळी त्वरित होणारे फायदे मोठ्या प्रमाणात दिसत असल्याने धोका पत्करून एफडीएला ते मंजूर करता येतात. सदर लस सर्व वर्ग आणि गटातील लोकांमध्ये प्रभावी ठरली आहे, असा दावा मॉडर्ना कंपनीने केला आहे. कोरोनाच्या काही गंभीर प्रकरणांमध्ये ही लस १०० टक्क्यांपर्यंत प्रभावी ठरली आहे.
विशेष म्हणजे अमेरिकेत फायझर लसी नंतर मॉडर्ना ही दुसरी प्रभावी लस असून ती लवकरच बाजारात दाखल होणार आहे. सुमारे एक आठवड्यापूर्वी फायझरने आपत्कालीन वापराला परवानगी देण्यासाठी अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) परवानगी मागितली. या वर्षाच्या अखेरीस, मॉडर्ना लसीचे २० कोटी डोस तयार करण्यात येणार आहेत. पुढील वर्षाच्या शेवटी, कंपनी बाजारात ५०० कोटी ते एक अब्ज डोस उपलब्ध करणार आहे. अमेरिकेच्या राष्ट्रीय आरोग्य संस्थांच्या सहकार्याने मॉडर्ना यांनी ही लस विकसित केली. लक्षावधी लोक या लसीच्या चाचणीत सहभागी झाले आहेत.
गेल्या शनिवार व रविवारच्या निकालांनुसार ही लस ९४.१ टक्के प्रभावी असल्याचे दिसून आले. तथापि, कंपनीने अंतरिम आकडेवारी जाहीर केली की, त्यांची लस ९४.५ टक्के प्रभावी आहे. दरम्यान, या कंपनीचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. टॉल जॅक म्हणाले की, लसीच्या चाचणी दरम्यान आम्ही अनेकांचे प्राण वाचवले. त्यानंतर की जेव्हा आम्हाला जेव्हा अंतिम निकालांमध्ये याबद्दल कळले तेव्हा डोळ्यात आनंदाश्रू दाटून आले.