माजी खासदार समीर भुजबळ यांनी केली प्रकल्पाच्या कामाची पाहणी
नाशिक – राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजवळ यांच्या प्रयत्नातून साकार होत असलेल्या मांजरपाडा (देवसाने) प्रकल्पाचे काम मे अखेर पर्यंत पूर्ण होणार असून यंदाच्या पावसाळ्यात येवला, चांदवडला पूर्ण क्षमतेने पाणी उपलब्ध होणार आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्देशावरून आज माजी खासदार समीर भुजबळ यांनी प्रकल्प स्थळी धरणाच्या बांधकामाची पाहणी केली. त्यावेळी अधिकाऱ्यांनी मे अखेर पर्यंत प्रकल्प पूर्ण होणार असल्याची माहिती दिली आहे.
यावेळी अधीक्षक अभियंता अरुण नाईक, कार्यकारी अभियंता योगेश सोनवणे, कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंपी, उपअभियंता सुभाष पगारे, सहायक कार्यकारी अभियंता दिनेश शेवाळे,दिलीप खैरे, मोहन शेलार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.









