‘
नाशिक – ‘एमबीए’नंतर पुढे काय? त्यातच कोरोनाचे सावट, उद्योग मंदावलेले. आत्ता कुठे नोकऱ्या मिळणार? असे प्रश्न अनेकांना सतावत असतील तर थोडं थांबा..अशा अनेक प्रश्नांना उत्तर दिलेय ‘मेट-एमबीए’ची विद्यार्थिनी ‘प्रियांका चावला’ हिने.. कारणही तसेच खास आहे. ‘प्रियांका चावला’ या २०१९-२०२१ बॅचमधील विद्यार्थिनीची ‘जारो ग्रुप ऑफ एजुकेशन’ या मुंबईस्थित कंपनीमध्ये प्लेसमेंट झाली असून तिला ८.६४ लाखांचे पॅकेज मिळाले आहे. याकरिता संस्थेचे संचालक डॉ. निलेश बेराड, प्लेसमेंट हेड श्री. दीपक वर्तक, प्राध्यापक व इतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. मेट प्रशासन, ट्रस्टी यांचेकडून अभिनंदन करण्यात आले.
मेट इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट, भुजबळ नॉलेज सिटी, नाशिक ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असणारी महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था मानली जाते. कोरोना काळातही विद्यादानाचे कार्य अविरत ठेवले. संस्था, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी व पालक यांच्या एकजुटीने या संकटावर मात करण्यास बळ मिळाले. प्रियांकाचे यश हे याचेच फलित म्हणता येईल. कॉलेजने सर्व शिक्षण ‘ऑनलाईन’ स्वरूपात उपलब्ध केले. रेग्युलर अभ्यासक्रमाबरोबरच स्पेशल ट्रैनिंग, वेबिनार, Quiz, स्किल डेव्हलपमेंट, प्रॅक्टिस सेशन्स, Mock-interviews, Video-Conference, सर्टिफिकेट कौर्सेस आदी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले. जरी संधीचे प्रमाण कमी झाले असले तरी उद्योगचक्र पुन्हा गतिमान होईल अशी अशा आहे. यावर्षीही प्लेसमेंटच्या अनेक संधी उपलब्ध होतील. मात्र स्पर्धा तीव्र झाल्याने विद्यार्थ्यांनी अधिक मेहनत करून सिद्ध करणे केव्हाही चांगले! मेट-एमबीए यासाठी मदतीला तयार असते.
प्रियांका चावलाने हे यश मिळविण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. इंटर्नशिप प्रोजेक्ट, इंग्रजी संभाषण, मार्केटअपडेट बरोबरच अभ्याक्रमातील अनेक संकप्लना उद्योगात कशा वापरायच्या याचे धडेही गिरविले. यानंतर ग्रुप डिस्कशन , टेकनिकल राऊंड, ऑपेरेशन राऊंड व फायनल Interview असे अनेक टप्पे पार करत आपला ‘ड्रीम जॉब’ मिळविलाच! तिची ‘Business Development Associate’ या पदावर नियुक्ती झाली आहे. याबाबत तिचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.