जळगाव : किनगाव (ता. यावल) येथे आयशर ट्रक उलटून १५ जणांचा मृत्यूची दुर्दैवी घटना घडली. पण, त्यानंतर एका महिलेच्या मृतदेहामागे संपुर्ण गाव धावत सुटल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या महिलेचा मृतदेह पळवून नेण्याचा प्रयत्न होत असल्याच्या भावनेतून ही धावपळ उडाली होती.
या अपघातातील मृतापैकी दहा जण रावेर तालुक्यातील अभोडा गावातील एकाच परिवारातील सदस्य होते. त्यात ही माहिला सुध्दा होती.या मृत महिलेचे सासर लोखंड्या (मध्यप्रदेश) या गावचे असून तिचा आणि तिच्या लहान मुलांचा मुत्युदेह नेण्यासाठी सासरवाडीची मंडळी अडून बसले होते. तसेच मुलांचा मुत्यदेह गाडीत असून ते स्मशानभुमीत दफन विधी करण्यासाठी आभोळा येथे घेऊन आल्यानंतर ते मुत्यदेह पळवून नेण्याची भावना नागरीकांमध्ये पाहण्यास मिळाली.
सासरची मंडळी आली अन् उडाला गोंधळ
मृत विवाहित महिला माहेरीच राहत होती. तीन वर्षांपूर्वी सासरच्या मंडळींनी महिलेला राहू देण्यास नकार दिल्याने ती आपल्या माहेरी राहत होती. अपघातात या विवाहितेचा मृत्यू झाल्याने सदर महिलेचा मृतदेह आभोडा या गावी आणण्यात आला होता. मात्र त्याचवेळी विवाहितेची सासरची मंडळी तेथे हजर होती. यानंतर गोंधळ उडाला.