नवी दिल्ली – स्टील किंग लक्ष्मी मित्तल यांचे छोटे भाऊ प्रमोद मित्तल यांना ब्रिटनमधील कंगाल व्यक्ती म्हणून घोषित केले जाऊ शकतात. प्रमोद मित्तल यांनी आपल्या मुलीच्या लग्नासाठी ५०० कोटी रुपये खर्च केले होते, त्यानंतर ते चर्चेत आले होते. मात्र, जूनमध्ये लंडनच्या कोर्टाने त्यांना कंगाल आणि फसवणूक करण्याऱ्यांच्या यादीत टाकले आहे.
प्रमोद मित्तल यांचे म्हणणे आहे की, त्यांच्यावर २.५ अब्ज डॉलर्स म्हणजे सुमारे २३,७५० कोटी रुपयांचे कर्ज आहे. टाइम्स लंडनच्या वृत्तानुसार, एका खासगी करारात मित्तल यांनी सर्व संपत्ती गमावली आहे. आता त्यांच्याकडे उत्पन्नाचे इतर कोणतेही साधन नाही. याबाबत स्वतः मित्तल यांनी माहिती दिली आहे.
त्यांच्याकडे केवळ दिल्ली येथील जमीन आहे. जागेची किंमत ४५ पौंड (४३०० रुपये) होती. महिन्याचा खर्च सुमारे २ लाख रुपये असल्याचे मित्तल यांनी सांगितले आहे. २०१३ मध्ये प्रमोद मित्तल यांनी मुलीचे लग्न गुंतवणूकदार गुलराज बहल यांच्याशी केले होते. ज्यामध्ये त्यांनी ५० दशलक्ष (सुमारे ५०० कोटी रुपये) खर्च केले. त्याचे मोठे भाऊ लक्ष्मी मित्तल यांच्या मुलीच्या लग्नापेक्षा जास्त खर्च आल्याचे त्यांनी उघड केले आहे.