नवी दिल्ली – पीडीपीच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती यांच्या स्थानबद्धतेत तीन महिन्यांची वाढ झाली आहे. जम्मू-काश्मिरचे नायब राज्यपालांनी तसे आदेश शुक्रवारी काढले आहेत. त्यामुळे त्यांचा बाहेर पडण्याचा मार्ग अद्यापही खडतर असल्याचे स्पष्ट होत आहे. जम्मू-काश्मिरमधील कलम ३७० हटविल्यापासून त्या स्थानबद्धतेत आहेत.