मुंबई – सध्याचा प्रचलित मुद्रांक शुल्क दर कमी करण्याचा निर्णय आज (२६ ऑगस्ट) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.
अभिहस्तांतरणपत्राच्या दस्तावरील प्रचलित मुद्रांक शुल्काचा दर १ सप्टेंबर २०२० पासून ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीकरिता ३ % ने तर १ जानेवारी २०२१ ते ३१ मार्च २०२१ या कालावधीकरिता २ % ने कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचा मोठा दिलासा राज्यातील नागरिकांना मिळणार आहे.
बांधकाम व सर्वस्तरातून या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. सध्या घर खरेदी करताना ५ टक्के मुद्रांक शुल्क, एक टक्के स्थानिक कर व नोंदणी शुल्क आकारले जात होते. राज्य सरकारने मुद्रांक शुक्ल घटविल्याने शहरी भागात पाच ऐवजी दोन टक्के मुद्रांक शुल्क लागणार आहे. २० लाखाच्या घरावर यापूर्वी एक लाख रुपये मुद्रांक शुल्क लागत होते ते आता केवळ ४० हजार रुपये लागणार आहे. ग्रामीण भागात यापूर्वी चार टक्के मुद्रांक शुल्क, एक टक्का स्थानिक कर आणि नोंदणी शुल्क होते. आता केवळ एक टक्का मुद्रांक शुल्क लागणार आहे. ही सवलत ३१ डिसेंबरपर्यंत आहे. १ जानेवारीपासून ३१ मार्च २०२१ पर्यंत हेच शुल्क शहरी भागात दोन ऐवजी तीन टक्के तर ग्रामीण भागात एका ऐवजी दोन टक्के मोजावे लागेल, असे सरकारने स्पष्ट केले आहे.
मुद्रांक शुल्काचे नवे दर असे