देवळा : मुद्रांक छेडछाड प्रकरणात देवळा येथील दुय्यम निबंधक प्रकाश गांगुर्डे यांचे चोकशी होईपर्यंत पदभार काढून घेण्यात आला आहे. त्यांच्या जागेवर माधव यशवंत महाले यांची तपास कामात अडथळा येऊ नये म्हणून नेमणूक करण्यात आल्याची माहिती जिल्हा मुद्रांक अधिकारी कैलास दवंगे यांनी दिली आहे.
मुद्रांक छेडछाड प्रकरणी तपास कामात अडथळा येऊ नये म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे. देवळा येथील एकाच क्रमांकाचे दोन मुद्रांक व त्यात छेडछाड प्रकरण समोर आले आहे. त्यानंतर जिल्हा मुद्रांक अधिकाऱ्यांनी तात्काळ तीन सदस्यीस पथकाची नेमणूक करून मंगळवारी उशिरापर्यंत देवळा दुय्यम निबंधक कार्यालयात चोकशी केली.