नाशिक ः मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिक शहरात कोरोना चाचणी अभियान हाती घेण्यात आले आहे. शिवसेनेच्या स्वीकृत नगरसेविका श्यामला दीक्षित आणि कार्यकर्त्यांनी शहराच्या अनेक भागात घरोघरी जाऊन तसेच रोजंदारी काम करणाऱ्या व्यावसायिकांच्या पर्यंत प्रत्यक्ष पोहोचून करोना तपासणी अभियान राबविले. इंदिरा नगर, दीपाली नगर सर्व विविध भागांमध्ये हे अभियान राबविण्यात आले. त्यात तज्ञ डॉक्टरांच्या मार्फत तापमान व ऑक्सिजनची पातळी मोजण्यात आले. आर्सेनिक अल्बम या रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात आले. सुयोग हॉस्पिटलचे डॉ कैलास राठी, डॉ मिथुन नगराळे, डॉ दीपक शर्मा यांच्या मदतीने पी पी इ किट घालून तसेच सॅनिटायझर मास्क हातमोजे सुरक्षित अंतर या सर्व दक्षता बाळगून तळागळातील नागरिकांची तपासणी केली. अभियानाच्या यशस्वीतेसाठी फरीदा रंगरेज, अनिता तीवाड ,कल्याणी शुक्ल, सोनल जाधव, कैलास जाधव, अतुल वाणी आधी कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले