शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मुख्यमंत्र्यांची ‘त्या’ प्रस्तावावर सही करण्यास टाळाटाळ; भाजपचा गंभीर आरोप

by India Darpan
ऑगस्ट 31, 2020 | 1:04 pm
in राज्य
0
download 8

मुंबई – खाजगी रुग्णालयांत माफक दरात उपचार मिळू शकणारा ‘दर नियंत्रण प्रस्ताव’ मुख्यमंत्र्यांकडे मागील ८ दिवसांपासून प्रलंबित ठेवण्यात आला आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांनी ‘फायलीवर’ न राहता या प्रस्तावाला तात्काळ मंजुरी द्यावी अशी मागणी आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. कोरोनाच्या महामारीत देशात क्रमांक एक वर असलेल्या महाराष्ट्र राज्यातील रुग्णांची लूट त्यामुळे होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

भातखळकर म्हणाले की, मुळात एवढ्या मोठ्या महामारीला सामोरे जात असताना राज्यसरकारने अधिक सजग व तत्पर राहणे अपेक्षित असते. कोरोना रुग्णांवर माफक दरात उपचार होण्यासाठी एवढ्या महत्त्वाच्या विषयावर मुदत संपण्याच्या किमान एक महिना अगोदरच पुढील आदेश निर्गमित होणे अपेक्षित होते. परंतु खाजगी रुग्णालयांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर हा निर्णय होत नाही, हे अधिकच संतापजनक असून हा अर्थपूर्ण विषय आहे का, याचाही शोध घेण्याची आवश्यकता आहे.

मुळात कोरोना व्हायरस मार्च मध्ये महाराष्ट्रात आल्यानंतर या संदर्भातला आदेश काढण्यास राज्यसरकार २२ मे पर्यंत थांबले व तो आदेश पुर्णतः सदोष पद्धतीने काढल्यामुळे खाजगी रूग्णालयांना रुग्णांची लूटमार करण्यास मोकळीक मिळाली. २२ मे च्या आदेशात डिपॉझिट घेण्यासंदर्भात उल्लेख न करून ‘दरवाजा बंद केला पण खिडकीतून लूटमार चालू ठेवण्याचे काम चालू राहिले’. आता तर मुदत संपली तरीही निर्णय न घेतल्यामुळे लूटमारीकरिता सताड दरवाजे उघडे करून दिले आहेत. हे महाभकास आघाडी सरकार नसून, हे तर महालुटारू सरकार आहे, अशी घणाघाती टीका आ. भातखळकर यांनी केली.

मुंबईतील ज्या रुग्णालयाने ग्राहकांची वारेमाप लूट केली व त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली जात होती, त्याच रुग्णालयाने माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या मुखपत्र असलेल्या सामना वर्तमानपत्रात मोठी जाहिरात दिली होती. याचा तर या निर्णयप्रक्रियेशी काही संबंध नाही ना, अशी शंका सुद्धा आ. भातखळकर यांनी व्यक्त केली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

येवला – गणेश विसर्जनसाठी नियोजन, गर्दी टाळण्याचे आवाहन

Next Post

नो टेन्शन! जायकवाडी ९० टक्के भरले

Next Post
IMG 20200807 WA0025

नो टेन्शन! जायकवाडी ९० टक्के भरले

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

cm dharangaon 1024x684 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धरणगावमध्ये ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन

जून 20, 2025
Untitled 68

लोकलमध्ये महिलांची हाणामारी, बघा, सोशल मीडियामधील व्हायरल व्हिडिओ

जून 20, 2025
jilha parishad

एमएसआरडीसीच्या कार्यकारी अभियंत्याविरोधात नाशिक झेडपीत फसवणुकीचा गुन्हा

जून 20, 2025
DAM

गंगापूर धरणाचा साठा ६५.३८ टक्के…तर जिल्ह्यातील इतर धरणाची ही आहे स्थिती…

जून 20, 2025
IMG 20250620 WA0127 1 e1750396792933

जे काही आहे….ते ठाकरे कुटुंबियामुळेच!.. माजी आमदार अनिल कदमांची भावनिक पोस्ट

जून 20, 2025
Picture13FLUO

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर थायलंडहून आलेला २५ कोटीचा हायड्रोपोनिक गांजा जप्त…

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011