विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची टीका
मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून महाराष्ट्राच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण होत नसल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. उद्धव हे पहिल्यांदाच मुख्यमंत्री झाले आहेत. मात्र, आता अनेक महिने झाले आहेत. राज्यामध्ये सरकारचे ठोस प्रतिबिंब दिसून येत नाही. अधिकाऱ्यांच्या समन्वयातून निर्णय क्षमतेचा वापर होणे आवश्यक आहे, असे मत फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. हे सरकार तीन चाकांचे आहे. त्यामुळे त्याला अपेक्षित गती साधता येत नाही. मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ आणि प्रशासन यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याची खोचक टीकाही त्यांनी केली आहे.