नाशिक – महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या नाशिकचा मेगा प्रकल्पाअंतर्गत असलेल्या गंगापूर धरणावरील ग्रेप पार्क रिसोर्टचे उदघाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाले आहे. ऑनलाईन झालेल्या उदघाटन सोहळ्यास उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री छगन भुजबळ, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यंटन मंत्री आदित्य ठाकरे, कृषी मंत्री दादा भुसे, विधानसभा उपाध्यक्ष नररही झिरवाळ, राज्य मंत्री आदिती तटकरे हे उपस्थितीत होते.
गेल्या अनेक वर्षापासून या रिसॉर्टचे काम रखडले होते. या रिसॉर्टमध्ये चार ट्रिन्व व्हिला बंगल्यात १२ लक्झरी सूट तर दुसऱ्या इमारतीत २८ लक्झरी सूट आहेत. त्याबरोबरच स्विमिंग पूल व रेस्टॉरंटसह येथे बिझनेस सेंटर, कॉफी शॉप आदी सुविधा आहेत. या रिसोर्टमुळे पर्यटनाला चालना मिळणार आहे. काँग्रेस – राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारमध्ये पर्यटन मंत्री असताना छगन भुजबळ यांनी या प्रकल्पाला चालना दिली होती. या रिसॉर्टमुळे गंगापूर धरण परिसरात पर्यटकांचा ओघ वाढणार आहे.
बघा या आलिशान रिसॉर्टचा व्हिडिओ
फोटो – उमेश नागरे
व्हिडिओ सौजन्य – एमटीडीसी
????