मुंबई – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील सरकार पाच वर्ष टिकेल असा विश्वास शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. भाजपचे प्रदेशाक्षाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुकीबाबत केलेल्या वक्तव्यानंतर त्यांनी आपले मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी निवडणुकीबाबत बोलण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची असते असा टोलाही लगावला. यावेळी त्यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मुलाखतीची तारीख अद्याप निश्चित नाही. ती ठरवण्यासाठी पुन्हा एकदा भेटू असे सांगत पुन्हा राजकीय चर्चेला स्पेस सोडला. यावेळी त्यांनी फडणवीस यांची मुलाखत अन एडिटेडच असेल असेही ते म्हणाले. भविष्यात राहुल गांधी, अमित शहा यांच्या सुध्दा मुलाखती घेऊ असे सांगत त्यांनी बिहारच्या निवडणुकीबाबत कोणतीही चर्चा फडणवीसांबरोबर झाली नसल्याचे सांगितले.