मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना लसीचा दुसरा डोस आज दुपारी घेतला. गेल्या महिन्यात त्यांनी कोरोना लसीचा डोस घेतला होता. त्यावेळी त्यांची पत्नी रश्मी आणि पुत्र व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे सुद्धा सोबत होते. मात्र, पत्नी रश्मी आणि पुत्र आदित्य हे सध्या कोरोना बाधित असल्याने ते उपचार घेत आहेत. त्यामुळे आज फक्त मुख्यमंत्र्यांनीच कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला.
https://twitter.com/CMOMaharashtra/status/1380043133698797574