मुंबई – भंडारा येथील सिव्हिल हॉस्पिटलच्या नवजात दक्षता विभागात (एसएनसीयु) मध्ये लागलेल्या आगीत दहा नवजात बालकांची मृत्यू झाला आहे. तर, सात बालक बचावले आहेत. या दुर्घटनेची राज्यासह देशभरात मोठी चर्चा होत आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज भंडारा दौऱ्यावर येत आहेत. थोड्याच वेळात ते हॉस्पिटलमध्ये दाखल होणार आहेत. हॉस्पिटलची आणि तेथील सुविधांची ते पाहणी करणार आहेत. तसेच, अधिकाऱ्यांची आढावा घेणार आहोत. ही दुर्घटना का व कशी घडली, याची माहिती ते घेतील. तसेच, बाळ दगावलेल्या कुटुंबियांचीही ते भेट घेतील आणि त्यांचे सांत्वन करतील. राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपयांची मदत जाहिर केली आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी करुन कारवाईचे आदेश मुख्यमंत्र्यांनी कालच दिले आहेत.