नाशिक – यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा ७ ऑक्टोबर पासून सुरू होत आहेत. संपूर्ण परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. मुक्त विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांचे वेळापत्रक अधिकृत वेबसाईटवर देण्यात आले आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार परीक्षा घेतल्या जाणार असून ऑनलाईन पद्धतीने पेपर देता येणार आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घेता हा निर्णय घेण्यात आल्याचे परीक्षा मंडळाने म्हंटले आहे. परीक्षेसंबंधी अडचण आल्यास अभ्यासकेंद्रांवर मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक काम पाहणार आहेत. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी http://ycmou. digitaluniversity.ac या अधिकृत वेबसाईटला भेट द्वावी असे आवाहन परीक्षा मंडळाने केले आहे.