मुंबई – रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कार्पिओ जीप आढळल्याने खळबळ उडाली आहे. त्यांच्या पेडररोडवर असलेल्या अँटिलिया या निवासस्थानाजवळ जिलेटिनचा साठा सापडला असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. त्यांच्याबरोबर फॉरेन्सिक टीम, आणि श्वानपथ आहे. या स्फोटकांसह एक चिठ्ठीही सापडली असून त्यामधून घातपाताची धमकी दिल्याचे बोलले जात आहे.
काल मध्यरात्री एक वाजता अँटिलियाजवळ ही स्कॉर्पिओ कार पार्क केल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फूटेजमधून समोर आले आहे. तर आज दुपारी तीन वाजता या कारसंदर्भातील फोन आल्याची माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे अंबानी यांच्या ताफ्यातील गाडीचा नंबर आणि स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ कारचा नंबर सारखाच असल्याचे समोर आले आहे.