राज्यातील ३४९ तालुक्यातील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे शुल्कमाफ – २०१९ च्या निर्णयाचे शुध्दीपत्रक
मुंबई – दुष्काळ सदृष्य परिस्थिती तसेच क्यार व महा चक्रीवादळामुळे आलेल्या अवेळी पावसाने नुकसान झालेल्या ३४ जिल्ह्यातील ३२५ तालुक्यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य शासनाने २०१९ मध्ये घेतला होता. त्याचे शुध्दीपत्रक शासनाने आता काढले असून त्यात आता वाढ केली आहे. आता त्यात २४ तालुक्यांची वाढ केली असून हा आकडा आता ३४९ झाला आहे. शासनाने याबाबत शुध्दीपत्रक काढले आहे. आॅक्टोंबर – नोव्हेंबर २०१९ मध्ये पावसामुळे मोठया प्रमाणात पिकांच्या नुकसानीमुळे बाधीत झालेले तालुके त्यात आहे..यात नव्याने समाविष्ठ तालुक्यांना ही सवलत मिळणार आहे..
जुने २०१९ चे परिपत्रक