नवी दिल्ली – भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे तात्पुरते सदस्य प्राप्त झाल्यानंतर या व्यासपीठावर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर पहिले भाषण झाले. यावेळी बोलताना त्यांनी दहशतवादविरोधी मुद्दा भारतासाठी किती महत्त्वाचा असणार आहे, हे स्पष्ट केले. यावेळी या परिषदेच्या सर्व स्थायी व कायमस्वरुपी सदस्यांच्या बैठकीत जयशंकर म्हणाले की, मुंबई हल्ल्यातील दोषींना पाककडून सेव्हन स्टार सुविधा देण्यात आल्या आहेत. दहशतवादाविरूद्ध लढा देण्याच्या प्रयत्नांना चालना दयावी लागेल, कारण मानवतेसाठी तो सर्वात मोठा धोका आहे. दहशतवादी मानवतेच्या मूलभूत तत्त्वाचा अंत करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
भारताच्या वतीने दहशतवादावर अंकुश ठेवण्यासाठी परराष्ट्रमंत्र्यांनी आठ कलमी सूत्र आंतरराष्ट्रीय समुदायासमोर मांडले. या माध्यमातून दहशतवादाला पाठिंबा देण्याच्या मुद्द्यावर पाकिस्तानने लक्ष्य करण्यासाठी भारताने कसलीही कसर सोडली नाही. जयशंकर म्हणाले की, दहशतवादाबद्दल सर्व देशांनी समान दृष्टीकोन स्वीकारला पाहिजे.
१) भारताचा पहिला फॉर्म्युला आहे की, कोणत्याही प्रकारे दहशतवादाचे औचित्य सिद्ध करणारे लोक दहशतवादाचे समर्थन करणारे म्हणून ठरविले पाहिजे.
२) दहशतवादाविरूद्धच्या लढाईत कोणीही मागे असू नये. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय दहशतवादाबाबत सर्व देशांनी समान दृष्टीकोन स्वीकारला पाहिजे.
३) पाकिस्तानकडे लक्ष वेधत जयशंकर म्हणाले की, दहशतवादाबाबत दुटप्पी भूमिका घेऊ नये. दहशतवादामध्ये चांगल्या आणि वाईट गोष्टींचा भेदभाव हा काही देशांचा अजेंडा असून ते त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी असे बोलत आहेत.
४) जयशंकर यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवाद आणि दहशतवादी देश यांच्यातील सामंजस्याकडे लक्ष वेधले आणि सर्व देशांना त्याबाबत अधिक गांभीर्य दाखविण्यास सांगितले.
५) पाक संदर्भात ते म्हणाले की, १९९३ च्या मुंबई बॉम्ब हल्ल्यातील काही गुन्हेगारांना शेजारील पाकिस्तानमध्ये पाठिंबा देण्यात येऊन त्यांना सेव्हन स्टार सुविधा देण्यात येत आहेत. दहशतवाद्यांच्या यादीमध्ये समाविष्ट होण्यासाठी किंवा दहशतवाद्यांच्या यादीतून कोणाला हटवायचे याविषयी जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्राला विनंती केली आहे .
६) दहशतवादा संदर्भातील निर्णय राजकीय आणि धार्मिक तथ्यावर आधारित असू नये. तसेच त्यांनी सूचित केले की, काही देश सध्याच्या धोरणांचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतात.
७) विशेष म्हणजे पाकिस्तान चीनच्यासह काही भारतीयांची नावे दहशतवाद्यांच्या यादीत समाविष्ट करण्याचा प्रस्ताव मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे.
८) धार्मिक कट्टरतावादाला चालना देणाऱ्या स्वतंत्र विचार संस्कृतीविरूद्ध भारताने आवाज उठविला आणि त्या विरोधात एकत्रित आंतरराष्ट्रीय विचारमंच विकसित करण्याचे एक सूत्र दिले आहे.