मुंबई – जागतिक बाजारातल्या तेजीच्या पार्श्वभूमीवर एचडीएफसी आणि एशियन पेन्टस या कंपन्यांच्या समभागांच्या जोरदार खरेदी झाली. त्यामुळे आज (२१ ऑगस्ट) मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक २१४ पूर्णांक ३३ शतांश अंकांनी उसळला आणि ३८ हजार ४३४ पूर्णांक ७२ अंकांवर पोचला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसभरात ३५९ अंकांनी वर जाऊन दिवसअखेर ५९ पूर्णांक ४० शतांश अंकांनी वधारला आणि ११ हजार ३७१ पूर्णांक ६० शतांश अंकांवर बंद झाला.
विदेशी मुद्रा विनिमय बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या किमतीत १८ पैशांनी वाढ होऊन अमेरिकन डॉलरची किंमत आज ७४ पूर्णांक ८४ पैसे इतकी झाली.