मुंबई – बृहन्मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीने (आप) टास्क फोर्सची घोषणा केली आहे. संघटन पातळीवर पार्टीचे काम वाढवणे, तसेच प्रचार यंत्रणा उभी करण्याचे काम या टास्क फोर्सच्या माध्यमातून होणार आहे. त्यासाठी आपने ६ लोकसभा मतदारसंघात प्रचार सचिवांची यादीही जाहीर केली आहे.
आपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या तसेच मुंबई महापालिका निवडणुक प्रभारी प्रीती शर्मा मेनन म्हणाल्या की,”आम्ही महापालिका निवडणुकीसाठी ‘टास्क फोर्स’ची घोषणा केली आहे. यासोबतच प्रचार सचिवांच्या घोषणा देखील ६ लोकसभा मतदारसंघाच्या पातळीवर करण्यात आल्या आहेत. या टास्क फोर्समध्ये पक्षातील सर्वच घटकांचा समावेश करण्यात आला असून प्रामुख्याने विद्यार्थी, युवक, महिला, व्यावसायिक, पत्रकार, गृहिणी, डॉक्टर्स, वकील आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. मुंबईकरांना गेली अनेक वर्षे नागरी सुविधांचा वानवा सोसावा लागत आहे. मुंबई महापालिकेच्या अकार्यक्षम कारभारामुळे मुंबईकरांचे आयुष्य संघर्षमय झाले आहे. आम आदमी पार्टी येणाऱ्या महापालिका निवडणुकीत ताकदीने उतरणार असून पारदर्शक व कार्यक्षम कारभाराची हमी आम्ही मुंबईकरांना देऊ इच्छित आहोत. ‘आप’ फक्त पर्याय नसून एक सक्षम पर्याय असणार आहे. या सक्षम पर्यायाच्या पाठीशी मुंबईकरांनी खंबीरपणे उभे राहावे”, असे मेनन यांनी सांगितले.
टास्क फोर्स असे
आदित्य पॉल
द्विजेंद्र तिवारी
इमितीयज मोगुल
काशीनाथ के
मनू पिल्लई
मिथिला नाईक- साटम
राधिका नायर
रूबेन मस्करहनस
साहिल पार्सेकर
सुमित्रा श्रीवास्तव
व्हाईस ऍडमिरल (निवृत्त) आय सी राव
लोकसभा मतदारसंघनिहाय प्रचार सचिव असे,
उत्तर मुंबई
गोविंद रावत
हरी मुरलीधर
लार्जी वरघीस
महेश चावडा
सावीओ सलधाना
सुमित सिंघ
उत्तर मध्य मुंबई
आशिष द्विवेदी
भरत सरवदे
डारील फेर्नांडिस
डॉ. दिनेश सिंघ
सलीम पटेल
सुरेश आचार्य
उत्तर पूर्व मुंबई
जोसेफाईन फेर्नांडिस
कार्तिक नायकर
लक्ष्मी थगुना
मिराज अन्सारी
पंकज गुप्ता
साजिद खान
उत्तर पश्चिम
अवरीता गौरी
अजीम फारुकी
इर्शाद शेख
जीलाजित यादव
राकेश कांकरिया
रुपाली इनामदार
दक्षिण मुंबई
अल्बर्ट संतीयगो
महेश दोषी
मुझमील हमीदानी
रौनक मस्तकर
सागर शर्मा
दक्षिण मध्य मुंबई
अखिलेश प्रजापती
दिनेश राणे
गणेश सावंत
नीता सुखटणकर
रौफ शेख
वसीम मेकर