मुंबई – अभिनेता सुशांत सिंह प्रकरणात मुंबई पोलिसांची बदनामी करणारे बिहारचे माजी पोलिस अधिकारी गुप्तेश्वर पांडे यांच्या प्रचाराला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जाणार आहेत का, असा सवाल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. एम्सच्या अहवालातून हे स्पष्ट होत आहे की, मुंबई पोलिसांचा तपास योग होता. मात्र, मुंबई पोलिसांसह महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या पांडे यांचा प्रचार फडणवीस करणार आहेत का, हे त्यांनी स्पष्ट करावे, असे आव्हान देशमुख यांनी दिले आहे. तसेच, राज्याची बदनामी करणाऱ्यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणीही देशमुख यांनी केली आहे.