नाशिक – मुंबई नाका परिसरात शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास दुचाकीवर आलेल्या दोघांनी चारचाकी (क्र एम एच १५ एच जी २८६८) मधून मागील काच फोडून १४ ते १५ लाख रुपयांची रक्कम चोरून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी मयुर राजेंद्र भालेराव (रा. पंचवटी ) यांनी मुबई नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलीस तपास करत आहे. या संदर्भात मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाल यांनी सदर घटनेचा तपास चालू असून फिर्यादी याच्या कडून माहिती घेत आहे. सदर घटनेच्या तपासासाठी ४ पथके रवाना करण्यात आले आहेत. सदर युवक हा कर्मचारी असून सदर रक्कम द्वारका येथून मुबई नाकाकडे एकास देण्यासाठी जात होता. यावेळी ही घटना घडली. या चोरी प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.