नवी दिल्ली – मुंबई ते नवी दिल्ली या दरम्यान असलेली राजधानी एक्सप्रेस आता दररोज धावणार आहे. रेल्वेने तसा निर्णय घेतला आहे. याचा फायदा उत्तर महाराष्ट्राला होणार आहे. ही रेल्वे यापूर्वी आठवड्यातून ३ दिवसच होती. खासदार उमेश पाटील यांनी यासंदर्भात रेल्वे मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली होती. त्यास गोयल यांनी मान्यता दिली. या रेल्वेमुळे अवघ्या १५ तासात राजधानी दिल्ली गाठणे शक्य होणार आहे. या एक्सप्रेसला नाशिक येथे थांबा आहे.
राजधानी स्पेशल एक्सप्रेस रोज धावणार ० जळगावहून दिल्ली येथे जाणाऱ्या प्रवाशांच्या सर्वाधिक सोयीची रेल्वे गाडी असलेली राजधानी एक्सप्रेस ही सप्ताहात तीन वेळेस धावत होती. आता मात्र या गाडीला नियमित करण्यात आली आहे. रेल्वेमंत्री @PiyushGoyal यांचे मनःपूर्वक आभार pic.twitter.com/sfMmrLKNJc
— Unmesh Patil (@UnmeshBPatil) January 12, 2021