भुसावळ – प्रवाशांची होणारी गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई व जालना दरम्यान दैनिक जनशताब्दी विशेष ट्रेन पुढील सल्ल्यापर्यंत चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
०२२७१ डाऊन जनशताब्दी स्पेशल दिनांक १४ फेब्रुवारी पासून पासून पुढील आदेशापर्यंत दररोज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून १२.१० वाजता सुटेल आणि जालना येथे १९.४५ वाजता पोहोचेल.
०२२७२ अप जनशताब्दी स्पेशल दिनांक १४ फेब्रुवारी पासून पासून पुढील आदेशापर्यंत दररोज जालना येथून ८.३० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे १६.२० वाजता पोहोचेल.
थांबे: दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, औरंगाबाद.
रचनाः तीन एसी चेअर कार आणि १७ द्वितीय श्रेणी बसण्याची व्यवस्था.
आरक्षण: पूर्णपणे आरक्षित विशेष ट्रेन क्र. ०२२७१ सामान्य भाड्याने १२ फेब्रुवारी पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रे व www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होतील.