पिंपळगाव बसवंत (ता. निफाड) – मुंबई आग्रा महामार्गावर शिरवाडे वणीनजीक नियंत्रण सुटल्याने कार पलटी झाली. या भीषण अपघातात आठ जण गंभीर जखमी झाले असून त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे.
प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील निफाड तालुक्यातील शिरवाडे फाट्याजवळ दशमेश हाॅटेलसमोर कारवरील (क्रमांक- एमएच ०३ बीएच ८२३०) ताबा तुटल्याने कार पलटी झाली. त्यात कारमधील नगमा खाटीक (२५), सहीदा खाटीक (५०), मुसाईत मौसीम खाटीक (६), मौसीम खाटीक (३०), अनावर शेख (८), अली शेख (५), रुक्शा शेख (३०), अझीन शेख (४०) सर्व जण राहणार ओझर हे जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच शिरवाडे फाटा येथील जगद्गुरु नरेंद्र महाराज संस्थानची मोफत रुग्णवाहिका अपघात स्थळी पोहोचली. जखमींना पिंपळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. यापैकी एक जण गंभीर जखमी आहे. त्यास नाशिकच्या डाॅ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
You may like to read
- नाशिकमध्ये विशाल रक्तदान अभियान…६००० शिबिर, एक लाख युनिट रक्त संकलित करण्याचा संकल्प
- नाशिक महापालिकेच्या प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा जाहीर…३१ प्रभाग १२२ नगरसेवक, हरकती मागवल्या
- आज रेखाताई नाडगौडा यांच्या संकल्पनेतून साकारणार आम्ही मराठी नृत्याविष्कार…तीन दिवस रंगणार महोत्सव
- कुंभमेळा निमित्त होणा-या विविध विकास कामाबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी घेतली जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक…