मुंबई – राजधानी मुंबईत कोरोना रुग्णांची वाढ होत असली तरी आतापर्यंत तब्बल ८६ हजार ३८५ रुग्णांनी कोरोनावर विजय मिळविला आहे. मुंबईत दिवसभरामध्ये तब्बल १ हजार ५८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर, दिवसभरात १ हजार २२३ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईत आतापर्यंत बाधित झालेल्यांची संख्या १ लाख १३ हजार १८७ झाली आहे. मुंबईतीला एकूण मृतांचा आकडा ६ हजार २९७ वर पोहचला आहे. सद्यस्थितीत २० हजार २११ रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाने सांगितले आहे.