सिरो सर्वेक्षणाचा निष्कर्ष
मुंबई ः सार्स-कोविड २ संसर्गाच्या अनुषंगानं केलेल्या एका सर्वेक्षणात झोपडपट्टी भागांमध्ये सरासरी सुमारे ५७ टक्के, तर बिगर झोपडपट्टी भागांमध्ये सुमारे १६ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाल्याचे दिसून आले आहे. सेरोलॉजिकल सर्वेलन्स, अर्थात रक्त नमुने घेऊन करायच्या सर्वेक्षणाचा उपक्रम नीती आयोग, बृहन्मुंबई महानगरपालिका, आणि मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च यांनी संयुक्तरित्या सुरु केला होता. या सर्वेक्षण अभ्यासाचा कालावधी चालू महिन्यातल्या पहिल्या पंधरवड्यातल्या १२ ते १४ दिवसांचा होता.
सर्वेक्षणामध्ये निर्धारित लक्ष्यापैकी झोपडपट्टी भागातून १०० टक्के तर बिगर झोपडपट्टी भागातून सरासरी ७० टक्के प्रतिनिधी सहभागी झाले. यात केलेल्या शास्त्रशुद्ध अभ्यासात असं ऍन्टीटबॉडीज प्राबल्य महिलांमध्ये किंचित जास्त आढळून आले. सामूहिक प्रतिरोधक शक्ती (हर्ड इम्यूनिटी) संदर्भात अधिक अभ्यास करण्यासाठी, हे परिणाम महत्त्वाचे ठरतील.