नाशिक : हॉटेल मध्ये मुक्कामी थांबलेल्या भोईसर येथील तरूणीचा चारित्र्याच्या संशयातून खून करण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. प्रियकराने बेदम मारहाण करीत तिचा गळा घोटल्याचा अंदाज वर्तविण्यात येत असून,त्यास न्यायालयाने सोमवार (दि.१८) पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
तन्मय प्रविण धानवा (२१ रा. मासवन जि.पालघर) असे पोलीस कोठडी सुनावण्यात आलेल्या संशयीताचे नाव आहे. भोईसर (जि.ठाणे) येथील अर्चना सुरेश भोईर या तरूणीचा मृतदेह बुधवारी (दि.१३) सीबीएस नजीकच्या हॉटेल सिटी पॅलेस मधील रूम नं.२०२ मध्ये मिळून आला होता. या संशयास्पद मृत्युने सर्वत्र खळबळ उडाली होती. अर्चना आडगाव परिसरातील एका नर्सिंग कॉलेज मधील विद्यार्थीनी असून, ती मंगळवारी बेपत्ता झाली होती. कुटूंबियांनी त्याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात मिसींग दाखल केली होती. त्याच दिवशी प्रियकर असलेला संशयीत तिला भेटण्यासाठी शहरात आला होता. दोघांनी सीबीएस नजीकच्या हॉटेल सिटी पॅलेस येथे मुक्काम केला. या काळात संशयीत तन्मय आणि अर्चनात चारित्र्याच्या संशयातून वाद होवून ही घटना घडल्याचे समजते. याबाबत अर्चनाचे वडिल सुरेश भोईर (रा.भोईसर) यांंनी तक्रार दाखल केली असून,त्यात संशयीताच्या काकाने फोनद्वारे माहिती दिल्याने हॉटेल गाठले असता मुलगी रूममधील बेडवर मृतावस्थेत होती. तिला मारहाण करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले. मुलीने प्रेमसंबध ठेवण्यास नकार दिल्याने तसेच चारित्र्याच्या संशयातून संशयीत तन्मय याने तिला मारहाण करून जीवे ठार मारल्याचे म्हटले आहे. घटनास्थळीच संशयीतास अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यास पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
….