नाशिक – मुंबईच्या युवतीचा येथील हॉटेलात संशयास्पद मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. सीबीएस परिसरातील एका नामांकित हॉटेलात ती मुक्कामी थांबली होती. याप्रकरणी मृत तरूणीच्या मित्रास पोलिसांनी ताब्यात घेतले असून, सरकारवाडा पोलिस चौकशी करत आहेत.
सरकारवाडा पोलिसानी दिलेल्या माहिती नुसार, अर्चना सुरेश भोईर (२१, रा. कल्लाले मान, भोईसर, ठाणे) असे मृत तरूणीचे नाव असल्याचे पुढे आले आहे. पालघर येथील तन्मय प्रवीण धानवा (२१, रा. मासवन कोळीपाडा) व अर्चना भोईर नामक तरूणी मंगळवारी (दि.१२) शहरात दाखल झाले होते. दुपारच्या सुमारास या युगलाने सीबीएस परिसरातील सिटी पॅलेस हॉटेल गाठून रूम बुक केली होती. या हॉटेल मधील २०३ रूम मध्ये युगल मुक्कामी थांबले होते. बुधवारी सकाळी चेक आऊट करून ते हॉटेल सोडणार होते. परंतू सकाळी अकराला त्यांनी व्यवस्थापकाची भेट घेत बुधवारीही रूम कायम ठेवली होती. सायंकाळच्या सुमारास तन्मयने आपल्या कुटूंबियास फोन करून बोलावून घेतल्याने ही घटना उघडकीस आली. सायंकाळी धानवा आणि भोईर कुटूंबिय अचानक हॉटेल मध्ये दाखल झाले असता हॉटेलचे व्यवस्थापक व अन्य कामगारांनी दुसºया मजल्यावरील खोली गाठली. यावेळी खोलीतील पलंगावर अर्चना मृतावस्थेत आढळून आली व तन्मय एका कोपºयात बसलेला होता. याबाबत व्यवस्थापकाने पोलिसांना माहिती दिली. काही वेळेतच सरकारवाडा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अर्चनाला तपासून बघितले असता ती मयत झाल्याची खात्री पटली. यावेळी पोलिसांनी तिच्यासोबत थांबलेल्या तन्मयला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. उशीरापर्यंत पंचनाम्याचे कामकाज सुरू होते. युवतीच्या संशयास्पद मृत्यूचे खून की आत्महत्या हे गूढ रात्री उशीरापर्यंत कायम होते. तिचा तोंड दाबून खून केल्याचा संशय व्यक्त होत असून रात्री उशीरापर्यंत तपास सुरू होता.