मुंबई – राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप झाल्याने याप्रकरणी त्यांनी तत्काळ मंत्रीपदाचा राजीनामा द्यायला हवा. मात्र, महाविकास आघाडीचे सरकार आणि मंत्री हे गेंड्याच्या कातडीचे आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून तशी अपेक्षा तरी करता येणार नाही. मात्र, आम्ही राजीनाम्याची मागणी करीत आहोत, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
पाटील यांची ट्विटर पोस्ट अशी
https://twitter.com/ChDadaPatil/status/1349285190296748033