नवी दिल्ली – जीवनात प्रत्येकजण चांगले जगण्याचे स्वप्न पाहतो, परंतु ते पूर्ण होत नाही, कधीकधी कोणावर विश्वास ठेवला तर आश्वासन मिळते, पण फसवणूक देखील होऊ शकते. अशीच मुजफ्फरपूरमधील एका १७ वर्षीय किशोरवयीन मुलीची कहाणी आहे. अपरिपक्व वयात तिने आपल्या प्रियकराशी लग्न करण्याचे स्वप्न पाहिले होते, मात्र कालांतराने तिची घोर फसवणूक झाली.
या मुलीची एका मुलाशी फोनवरून मिसकॉल आल्याने ओळख निर्माण झाली त्यातून प्रेम प्रकरण सुरू झाले. सुमारे अडीच महिन्यांपूर्वी तिने नवीन आयुष्याचे स्वप्न पाहिले आणि कुटुंब सोडून ती आपल्या प्रियकरासमवेत पाटण्याहून दिल्लीला पळून गेली. मात्र जेव्हा भयानक सत्य सामोरे आले, तेव्हा तिच्या त्याच्या पायाखालची जमीन सरकली. कारण ज्या प्रियकराबरोबर तिने सात फेरे घेण्याचे स्वप्न पाहिले होते, त्या प्रियकराने तिचे शोषण करण्यास सुरवात केली.
आमिष पळून आल्यावर त्याने लग्न करण्यास नकार तर दिलाच, त्याऐवजी त्याने आपल्या प्रेयसीला वैश्या व्यवसायामध्ये ढकलून कॉल गर्ल बनविले. त्यासाठी त्याने स्वतःहून ग्राहकांची बुकिंग सुरू केली. ज्यासाठी त्याने नोएडा मधील एक हॉटेल देखील भाड्याने घेतले आणि इतर दोन तरुणांसह या हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय सुरू केला.
मात्र, नोएडा पोलिसांनी या हॉटेलवर छापा टाकला तेव्हा ही घटना उघडकीस आली आणि तेथून या अल्पवयीन मुलीची सुटका केली. तसेच या प्रियकरासह इतर आरोपींना अटक केली. गेल्या दोन महिन्यांपासून हा युवक त्या मुलीवर अत्याचार करीत होता. सध्या या मुलीला नारी निकेतन येथे पाठविण्यात आले असून तिचा प्रियकर तुरूंगात आहे.
दरम्यान, एडीसीपी रणविजय सिंह म्हणाले की, या अल्पवयीन मुलीची आणि युवकाची पोलिस कर्मचार्यांकडून करून चौकशी केली असता, त्यांची प्रेमकथा मिस् कॉलवरून सुरू झाली, असे कळले. सदर आरोपीने तिच्या मोबाइलवर मिस कॉल केला होता, त्यानंतर जेव्हा तिने कॉल केला तेव्हा दोघांमध्ये संभाषण सुरू झाले.
लग्नाच्या बहाण्याने त्याने तिला दिल्लीत आणले, आणि कॉलगर्ल बनविले, जेव्हा ती विरोध करत असे, तेव्हा तो तिला मारहाण करीत होता, असेही पोलीसांनी सांगितले.