नाशिक – ‘मिशन झिरो नाशिक’ या अभियाना अंतर्गत महानगरपालिका आणि नाशिक बार असोसिएशन यांच्यावतीने कोरोना रॅपिड अँटिजेन चाचणी आयोजित करण्यात आली. यात वकील व न्यायालयीन कर्मचारी सहभागी झाले. १०० जणांनी या चाचणीचा लाभ घेतला. सकाळी ११.३० ते दुपारी ३ या वेळेत शनिवारी (२९ ऑगस्ट) ही चाचणी घेण्यात आली. त्यासाठी नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड नितीन ठाकरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी परीश्रम घेतले.