नाशिक : येथील ‘पूर्वा केमटेक प्रा.लि’ तर्फे ‘मिलांज महाराजा’ ही प्रतिष्ठेची स्पर्धा दरवर्षीप्रमाणेच; परंतु यंदा कोरोना नियमांचे पालन करून, केवळ परिक्षकांच्या उपस्थितीत मुखेड, पिंपळगाव बसवंत येथील ‘बसवंत गार्डन’ मध्ये पार पडली. या स्पर्धेचे सोशल मिडियावर ऑनलाईन प्रसारण करण्यात आले.
या स्पर्धेत नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, पुणे, सांगली आदी जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी आपली उत्कृष्ट द्राक्षे व केळी उत्पादनांचे विविध जातींचे नमुने पाठवून सहभाग नोंदवला. हिरवी द्राक्षे गटात जवळपास २५०, काळी द्राक्षे गटात १०० तर केळी गटात ६५ उत्पादक सहभागी झाले.
हिरवी द्राक्षे गटातील मानाचा ‘मिलांज द्राक्ष महाराजा’ हा किताब राजवर्धन मोहिते (वडनेर भैरव, ता. चांदवड) तर काळी द्राक्षे गटातील ‘मिलांज द्राक्ष महाराजा’ पुरस्कार शुभम दवंगे (खेडगाव, ता. दिंडोरी) यांनी मिळवला. ‘बनाना किंग’ पुरस्कार दिलीप महाजन (धानोरा, ता. चोपडा) यांच्या केळी उत्पादनाला देण्यात आला.
या व्यतिरिक्त हिरवी द्राक्षे गटात मंगेश पवार (वडनेर भैरव, ता. चांदवड) यांना प्रथम, सतीश जाधव (सोनी, ता. मिरज) यांना द्वितीय तर अनिल शेळके (मुखेड, ता. निफाड) यांच्या उत्पादनांना तृतीय पुरस्कार देण्यात आला. काळी द्राक्षे गटात विकास आथरे (उंबरखेड, ता. निफाड), श्रीकांत वायकर (गुंताळवाडी, ता. जुन्नर) व किरण भोज (मातेरेवाडी, ता. दिंडोरी) यांच्या उत्पादनांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पुरस्कार देण्यात आले. ‘बनाना किंग ‘ गटात प्रथम- बापूसाहेब पाटील (तरडी, ता. शिरपूर), द्वितीय- जगदीश पाटील (पिंपळगाव कमानी, ता. जामनेर) तर अनिल पाटील (हिवरखेडा, ता. जामनेर)-तृतीय हे
पुरस्कारांचे मानकरी ठरले.