नवी दिल्ली ः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी प्रसिद्ध अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची मंगळवारी (१६ फेब्रुवारी) सकाळी मिथुन यांच्या कोलकाता इथल्या निवसस्थानी भेट घेतली. एका हिंदी संकेतस्थळानं याबाबतचं वृत्त दिलं आहे. पश्चिम बंगालमध्ये आगामी काळात होणार्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोघांच्या भेटीकडे राजकीय दृष्टिकोणातून पाहिले जात आहे. मिथुन यांच्या भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चेलाही उधाण आलं आहे.
मिथुन चक्रवर्ती हे तृणमूल काँग्रेसकडून राज्यसभेवर गेले होते. मात्र सभागृहात सतत अनुपस्थित राहात असल्यानं त्यांनी वीस महिन्यातच राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून ते राजकाराणापासून दूरच होते. २०१९ मध्ये त्यांनी आरएसएस मुख्यालयाला भेट दिली होती. त्या वेळी त्यांनी आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांचीही भेट घेतली होती. आजच्या भेटीमुळे त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.
https://twitter.com/SreyashiDey/status/1361640376092647435