लासलगाव – कोलकत्ता- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट कोलकत्ताने सेव्हण लेक फेस्ट अंतर्गत मिक्सआर्ट ही राष्ट्रीय पातळीवर स्पर्धा आयोजित केली होती. ज्यात स्पर्धकांना २ वेगवेगळ्या काल एकत्र सादर करायच्या होत्या. या स्पर्धेत, शिवानी राजेंद्र होळकर हिने दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळवले आहे. या स्पर्धेसाठी तिने स्ट्रिंग आर्ट,आणि मंडला आर्ट हे कलाप्रकार सादर केले होते. स्पर्धेमध्ये संपूर्ण भारता मधुन १३९ संघांनी सहभाग घेतला होता. यामध्ये आयआयएम कोलकत्ता, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, वेल्लोर इन्स्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजी, यांसारख्या अनेक महाविद्यालयांतील विद्यार्थी होते. या स्पर्धेचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला.