नाशिक – कोरोनाची संख्या वाढत असल्यामुळे महानगरपालिकेने धडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आज महानगरपालिकेने हॉटेलच्या लॉबीत विना मास्क फिरणाऱ्या २ डॉक्टरांवर कारवाई केली. हे डॅाक्टर सेमिनारसाठी आले होते. या डॅाक्टरांबरोबरच हॉटेल लॉबीत विना मास्क काम करणाऱ्या हॉटेलच्या पाच कर्मचाऱ्यांवरही पालिकेची कारवाई केली आहे.
कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्यामुळे महानगरपालिकेची कारवाई सुध्दा मंदावली होती. पण, आता संख्या वाढू लागल्यामुळे आता महानगरपालिकेचे पथक कार्यरत झाले आहे. त्यांनी शहरात विविध ठिकाणी या कारवाईला आता सुरुवात केली आहे. त्यामुळे येत्या काळात कोरोनाशी संबधीत नियमांचे उल्लंघन करणा-यांना दणका बसणार आहे.