मालेगाव – आनंदाच्या भरात कोण काय करेल, याचा नेम नाही. शहरातील १३ क्रमांकाच्या वॉर्डात तब्बल ३० वर्षांनंतर गटार आणि रस्त्याचे काम झाल्याने स्थानिक प्रतिष्ठित नागरिक भलताच खुष झाला. आनंदाच्या भरात त्याने थेट हवेत गोळीबार केला. परवाना असलेल्या या बंदुकीतून अशा प्रकारे गोळी झाडणे आता त्याचा अंगलट आले आहे. पोलिसांनी पवारवाडी पोलिस स्थानकात या प्रकरणी गुन्हा दाखल करुन बंदुकही जप्त केली आहे.
बघा हा व्हिडिओ