मालेगाव- योगा फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने दि. १५, १६, १७ जानेवारी ह्या रोजी कोविड ची परिस्थिति पाहाता ऑनलाईन माध्यमातून राष्ट्रीय स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेत २५ राज्य सहभागी झाले. सदर स्पर्धेत मालेगाव येथील सोहम योगा अकॅडमी च्या अनेक स्पर्धकांनी सहभाग नोंदविला व काही खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरले. त्यामध्ये
वयोगट : १४ ते १६
हर्षदा जाधव- तिसरी
स्नेहल वाणी- पाचवी
हर्षदा जाधव- तिसरी
स्नेहल वाणी- पाचवी
वयोगट : १६ ते १८
पुनम इंगळे- तिसरी
कीर्ती बोरसे- चौथी
निवड झालेले खेळाडू इंटरनॅशनल योगा फेडरेशन च्यावतीने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होतील व भारताचे प्रतिनिधित्व करतील . निवड झालेले खेळाडू गेल्या अनेक वर्षा पासून सोहम योगा एकेडमी येथे सराव करत आहेत
सर्व यशस्वी खेळाडूंना राष्ट्रीय पंच व सोहम योगा एकेडमी चे संचालक श्री.चेतन वाघ सर व आंतरराष्ट्रीय पंच डॉ. अनिता पाटील मैडम यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. विजयी खेळाडूंचे मालेगाव नगरीत सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.